Thursday, July 28, 2011

अस्तित्व

कधी कधी सगळे असून सुद्धा का एकटे वाटते ,
इध्राधानुय्षा सारखे एकत्र असून पण प्रत्येक रंग स्वतःचे अस्तित्व बाळगते.
जीवनात किती मित्र आपल्या सोबत असतात,
आठवून बघा शाळेत असताना तो मित्र/मैत्रीण घरापासून शाळेपर्यंत जातांना आणि येतांना,
आणि आज आपण त्याचाशी किती वेळ फोनवर बोलतो ?
तेव्हा तो एक दिवस शाळेत नाही आला तर चुकल्या-चुकल्या सारखे वाटायचे
आणि आज त्याच्याशिवाय पण आपला सगळं नीट चालला आहे :)

अशी कित्येक व्यक्ती आपल्या बरोबर असतील मात्र,
आयुष्याच्या टप्या-टप्या वर व्यक्ती बदलत असतात.
पण कधीतरी अस्युश्यात एकदा तरी ,
मागे जावे आणि त्यासर्व आठवणीना उजाळा द्यावा.

मिलिंद मदाने.

No comments:

Post a Comment